तुळजापूर/उमाजी गायकवाड
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आजपासून बारावीच्या (HSC) परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
स्थानिक श्री तुळजाभवानी महाविद्यालय परीक्षा केंद्रावर प्रभारी नगराध्यक्ष श्री रामचंद्र (आबा) रोचकरी आणि नगरसेवक विशाल (भैय्या) रोचकरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना पेन आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. 'परीक्षा म्हणजे भीती नाही तर संधी आहे' हा संदेश देत लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी नगरसेवक रत्नदीप भोसले, अमरजीत बागल, दुर्गेश साळुंके, जितू आडेकर, हारी खुरुद, जीवन माने, सौदागर मोटे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींच्या या प्रेमाच्या आपुलकीमुळे परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा ताण हलका झाल्याचे पाहायला मिळाले.
बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा
"बारावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांच्या मनातली भीती कमी व्हावी आणि त्यांनी सकारात्मक भावनेने परीक्षेला सामोरे जावे, यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे. तुळजापूरच्या या लेकरांनी जिद्दीने यश संपादावे, हीच आई भवानी चरणी प्रार्थना."
— रामचंद्र (आबा) रोचकरी (प्रभारी नगराध्यक्ष, तुळजापूर)
विद्यार्थ्यांनी संयमाने पेपरला सामोरे जावे
"आजचा हा पेन केवळ शुभेच्छांचे प्रतीक नसून तो तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेला आशीर्वाद आहे. विद्यार्थ्यांनी संयम राखून पेपर लिहावेत, संपूर्ण तुळजापूर शहर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!"
— विशाल भैय्या रोचकरी रोचकरी (नगरसेवक, तुळजापूर
0 Comments