Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापुरात रंगली 'दप्तरमुक्त शाळा': चिमुकल्यांनी 'शाळा माझी मराठी' गाण्यावर धरला ठेका!

तुळजापूर/उमाजी गायकवाड 
तुळजापूर: शहरातील नगरपरिषद शाळा क्रमांक २ मध्ये 'दप्तर विना शाळा' हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. दर शनिवारी होणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे तर हलके झालेच, पण शाळेची ओढही वाढली आहे.

या विशेष दिवशी विद्यार्थ्यांनी पुस्तकी अभ्यासाला सुटी देत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. "शाळा माझी मराठी हो, कशी लेकरा धरती पोटी हो" या लोकप्रिय गीतावर विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिक्षकांनी केवळ अभ्यासाचे ओझे न देता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिल्याने पालकांकडूनही या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. अशा उपक्रमांमुळे सरकारी शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचे चित्र तुळजापुरात पाहायला मिळत आहे. 

नगरपरिषद शाळा क्रमांक 2 मधील चिमुकल्यांनी दप्तर विना शाळा उपक्रमाचा आनंदोत्सव साजरा करतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पहा...

https://www.facebook.com/share/r/1HGV5Ge4yk/


Post a Comment

0 Comments