Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

"वीजदरवाढ आणि स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सरकारचा जनतेच्या खिशावर दरोडा!" - आमदार कैलास पाटील यांचा महायुतीवर घणाघात; कसबे तडवळेकरांना परिवर्तनाचे आवाहन

​धाराशिव: "एकीकडे विकासाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे स्मार्ट मीटर, वीजदरवाढ लादून सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करायची, हाच महायुती सरकारचा दुटप्पी चेहरा आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर टाळाटाळ करणाऱ्या आणि लाडकी बहीण योजनेत अटींचे अडथळे आणणाऱ्या या सरकारला आता मतपेटीतूनच त्यांची जागा दाखवा," असे आवाहन ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केले.
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कसबे तडवळे येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी येडशी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार देवदत्त भागवत मोरे, येडशी पंचायत समिती गणातील निता गजानन नलावडे आणि कसबे तडवळे गणातील बालाजी अंबऋषी मनके यांच्या प्रचारासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
​सरकारवर तोफ डागताना ठाकरे सेनेचे आमदार पाटील म्हणाले,सत्तेत आल्यावर सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विसर पडला आहे. 'लाडकी बहीण' योजनेचे श्रेय लाटायचे, पण 'केवायसी'च्या नावाखाली भगिनींना लाभापासून वंचित ठेवायचे, हा प्रकार संतापजनक आहे. महागाईने आधीच कंबरडे मोडलेल्या जनतेवर आता स्मार्ट मीटरची सक्ती करून सरकार जनतेच्या घरात नव्हे तर खिशात हात घालत आहे.
​या अन्यायाविरोधात आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढणारी शिवसेना (उबाठा) हीच तुमची खरी ताकद आहे. त्यामुळे येडशी गटाच्या आणि गणाच्या सर्वांगीण विकासासाठी 'मशाल' चिन्हा समोरील बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा,असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आपल्या भागातील रस्ते, पाणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन..
--देवदत्त मोरे, उमेदवार 
​​"कसबे तडवळे येथील सभेला मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद सांगतोय की, जनता या खोके सरकारला कंटाळली आहे. आमदार कैलास पाटील साहेबांनी मांडलेले मुद्दे हे प्रत्येक सामान्य घरातले मुद्दे आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या भागातील रस्ते, पाणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. हे सरकार फक्त घोषणांचे आहे, पण आम्ही कामाची माणसं आहोत. त्यामुळेच, येडशी गटातील मायबाप जनता अन्यायाचा बदला घेण्यासाठी आणि विकासाची ‘मशाल’ पेटवण्यासाठी मला नक्कीच आशीर्वाद देईल, हा मला विश्वास आहे."

  -देवदत्त भागवत मोरे (उमेदवार, येडशी जि.प. गट)

Post a Comment

0 Comments