Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

🔬 बाल वैज्ञानिकांचा उत्स्फूर्त जल्लोष! पांगरदरवाडी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील जि. प. प्रा. शाळेत  दि. 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वांगीण विकास हे शाळेचे प्रमुख उद्दिष्ट असून, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनानिमित्त विविध विज्ञान घटकांवर आधारित कोडी तयार केली. तसेच आकर्षक आणि माहितीपूर्ण आकृत्या रेखाटून आपली कल्पकता सादर केली. विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांमध्ये विज्ञानाबाबत उत्सुकता निर्माण केली.

चिमुकल्या ‘बाल वैज्ञानिकांनी’ विज्ञान दिनाचा आनंद लुटत आपल्या कौशल्याची झलक दाखवली. या उपक्रमासाठी विज्ञान पदवीधर शिक्षिका श्रीमती भावना बाबुराव चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक व्यंकट कोळी व सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या अभिनव उपक्रमाचे पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी विशेष कौतुक केले असून, विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणारा हा उपक्रम ठरल्याची भावना व्यक्त केली.
                           — Only न्यूज धाराशिव

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी!

Post a Comment

0 Comments