Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

ग्रामीण भागातील गुणवत्तेचा डंका! काटीच्या 'येडेश्वरी कन्या प्रशाले'ची गरुडझेप; येडेश्वरी कन्या प्रशालेचा यशाचा षटकार; NMMS परीक्षेत सहा विद्यार्थी चमकले!

काटी/उमाजी गायकवाड 
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) काटी येथील येडेश्वरी कन्या प्रशालेने आपल्या यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये झालेल्या या परीक्षेत प्रशालेचे एकूण सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांनी शिष्यवृत्तीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये गुणानूक्रमे कु. काजी मेहरीन वसीम (89 गुण),कु. कांबळे गौरी अभिमन्यू (88 गुण),कु. राठोड स्विटी सुरेश (72 गुण),कु.गाटे राणी शाम (72 गुण),चि.पांगे मयूर महेश (72 गुण), चि.सोनवणे शिवम कमलाकर (71 गुण) या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

मार्गदर्शन व परिश्रम 
या विद्यार्थ्यांच्या यशामागे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. किशोर बनसोडे, श्री. सुनिल खेंदाड आणि श्री. उमाकांत कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. परीक्षा विभागप्रमुख म्हणून श्री. गणेश गुंगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

यांनी केले कौतुक 
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  श्री. मनोहरपंत सपाटे साहेब, जनरल सेक्रेटरी श्री. महेश माने, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्री. शिवदास चटके, मुख्याध्यापक श्री. किशोर बनसोडे व काटी ग्रामस्थांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.

शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि मुलांची मेहनत यामुळेच यश
     --मुख्याद्यापक बनसोडे 
"NMMS सारखी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची कसोटी पाहणारी असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि मुलांची मेहनत यामुळेच प्रशालेचा निकाल उत्कृष्ट लागला याचा सार्थ अभिमान वाटतो.आमच्या प्रशालेचा मुख्य उद्देश केवळ साक्षरता नसून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हा आहे. आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीमुळे शिक्षणासाठी मोठी मदत होणार आहे. या यशाचे सर्व श्रेय विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या माझ्या शिक्षक सहकाऱ्यांना जाते."
— श्री. किशोर बनसोडे (मुख्याध्यापक, येडेश्वरी कन्या प्रशाला,काटी)

✍️आमच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा – 'Only न्युज धाराशिव'

Post a Comment

0 Comments