Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

विशेष लेख"जनसेवेचा वसा अन् विकासाचा ध्यास! संघर्षातून, शुन्यातून विश्व निर्माण करणारे ग्रामीण ध्येयवादी नेतृत्व! माजी सभापती संतोष (दादा) बोबडे यांचा आज वाढदिवस; वाढदिवसाचे औचित्य साधून सावरगावात 'रक्तदान महायज्ञ'!सावरगावात उत्साहाचे वातावरण."


काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्याच्या राजकारणात ज्यांच्या नावाचा दरारा आहे आणि समाजकारणात ज्यांच्याबद्दल अतोनात आदर आहे, असे अष्टपैलू नेतृत्व म्हणजे माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य संतोष (दादा) बोबडे. आज 25 फेब्रुवारी, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा "Only न्युज धाराशिव" ने घेतलेला हा विशेष आढावा...

संतोष दादांच्या वाढदिवसाचे आणि शिवजयंतीचे औचित्य साधून आज बुधवार, 25 फेब्रुवारी रोजी सावरगाव येथील छत्रपती शिवाजी चौक (एसटी बसस्थानक) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झालेले हे शिबीर दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असून, जास्तीत जास्त युवकांनी यात सहभागी होऊन 'रक्तदान' हे सर्वश्रेष्ठ दान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शून्यातून विश्व निर्माण करणारा ग्रामीण 'लोकनेता'
25 फेब्रुवारी 1976 रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात रामदास बोबडे व लक्ष्मीबाई यांच्या पोटी दादांचा जन्म झाला. अत्यंत सामान्य परिस्थितीतून जिद्दीच्या जोरावर त्यांनी आज जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. वयाच्या 18 व्या वर्षापासूनच समाजसेवेची ओढ असलेल्या दादांनी ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडली आणि सावरगावसह परिसराच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली.

राजकीय प्रवास: काँग्रेस ते भाजप आणि यशस्वी घोडदौड
सुरुवात: ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात.
भाजप प्रवेश: 2019 मध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश.
तालुकाध्यक्ष पद: भाजपच्या पक्षवाढीसाठी केलेल्या कामाची दखल घेत त्यांच्यावर तुळजापूर तालुकाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली, जी त्यांनी अत्यंत यशस्वीपणे पेलली.
सत्तेतील पदे: जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशी अनेक पदे भूषवून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला.

विकासाचे 'सावरगाव मॉडेल' आणि दादांची कार्यशैली
एकेकाळी सोलापूर-धाराशिव सीमेवरील दुर्लक्षित गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावरगावचा कायापालट करण्याचे श्रेय संतोष दादांना जाते. गावातील वाद मिटवून सर्वांना सोबत घेण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांना त्यांचे धाकटे बंधू आनंद बोबडे यांची खंबीर साथ लाभत आहे, जे व्यवसायासोबतच सामाजिक जबाबदारीही चोख पार पाडत आहेत.

"खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारा स्पष्टवक्ता नेता, पण कार्यकर्त्यांसाठी सदैव तत्पर असणारा दिलदार माणूस म्हणजे संतोष दादा!"

सभापती पदासाठी प्रबळ दावेदार!
नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये दादांनी स्वतःच्या गणासह जिल्हा परिषद गटात भाजपला मोठे यश मिळवून दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि दांडगा जनसंपर्क पाहता, तुळजापूर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी त्यांचे नाव सध्या अग्रक्रमाने घेतले जात आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

"Only न्युज धाराशिव" चे मुख्य संपादक उमाजी गायकवाड व गायकवाड परिवारातर्फे जनसेवेचा वसा घेतलेल्या या अष्टपैलू नेतृत्वापुढील वाटचालीस आणि वाढदिवसास लाख-लाख शुभेच्छा!

शब्दांकन:
उमाजी गायकवाड
मुख्य संपादक, Only न्युज धाराशिव

आमच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा – 'Only न्युज धाराशिव'

Post a Comment

0 Comments