Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

हर्षवर्धन गुंडने उसाचे एकरी 103 टन उत्पादन घेत रचला इतिहास; जिल्हाधिकारी किर्ती पुजारी यांच्या हस्ते हर्षवर्धन गुंड यांचा गौरव; वडिलांच्या अनुभवाला मिळाली आधुनिक विज्ञानाची जोड

AI तंत्रज्ञानाचा शेतीत चमत्कार! काटीच्या युवा शेतकरी 
काटीतील युवा शेतकरी हर्षवर्धन बाळासाहेब गुंड याचा सत्कार करताना उपस्थित मान्यवर....

काटी/उमाजी गायकवाड 
शेती हा तोट्याचा व्यवसाय आहे, असे म्हणणाऱ्यांसाठी तुळजापूर तालुक्यातील काटी  येथील एका तरुण शिक्षित शेतकऱ्याने नवा आदर्श घालून दिला आहे.टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS),तुळजापूर येथे कृषी पदवीच्या (Bachelors in Agriculture) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या हर्षवर्धन बाळासाहेब गुंड याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून उसाचे एकरी 103 टन विक्रमी उत्पादन घेतले आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी किर्ती पुजारी यांच्या हस्ते हर्षवर्धन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. हर्षवर्धन याने केवळ पुस्तकी ज्ञान न मिळवता, त्याचा प्रत्यक्ष शेतीत वापर करून दाखवल्याबद्दल प्रशासकीय स्तरावरून त्यांचे मोठे कौतुक होत आहे.

अनुभवी वडील आणि तंत्रज्ञ मुलगा: यशाची गुरुकिल्ली
हर्षवर्धन यांचे वडील बाळासाहेब श्रीमंत गुंड हे काटी गावचे माजी उपसरपंच असून ते स्वतः एक प्रगतिशील आणि कष्टाळू शेतकरी आहेत. त्यांनी आयुष्यभर शेतीत नवनवीन प्रयोग करत भरघोस पिके घेतली आहेत. वडिलांच्या याच कष्टाच्या वारशाला हर्षवर्धनने आधुनिक विज्ञानाची जोड दिली. तुळजापूर येथील 'TISS' सारख्या नामांकित संस्थेत कृषी शिक्षण घेत असताना, त्याने पिकांवरील रोगराई, खत व्यवस्थापन आणि पाण्याचे अचूक नियोजन करण्यासाठी 'AI' आधारित सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाचा वापर केला.

काय म्हणाले जिल्हाधिकारी?
सत्कार प्रसंगी जिल्हाधिकारी किर्ती पुजारी म्हणाले, "हर्षवर्धन सारख्या तरुणांनी शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे. उच्च शिक्षण घेऊन आधुनिक तंत्रज्ञान शेतात राबवल्यामुळेच 103 टनांसारखे अशक्य वाटणारे उद्दिष्ट गाठता आले. हे यश इतर सुशिक्षित तरुणांना शेतीकडे वळवण्यासाठी प्रेरणादायी ठरेल."

वडिलांची सार्थ अभिमानाची भावना
या यशाबद्दल बोलताना माजी उपसरपंच तथा प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब गुंड म्हणाले,"आम्ही आयुष्यभर पारंपरिक पद्धतीने मेहनत केली, पण आजच्या काळात केवळ कष्टाने चालत नाही तर त्याला विज्ञानाची जोड द्यावी लागते. हर्षवर्धन सध्या 'टाटा इन्स्टिट्यूट'मध्ये शेवटच्या वर्षाला आहे, त्याने तिथे शिकलेल्या गोष्टी आपल्या शेतात राबवल्या. एका बापासाठी यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो की, आपला मुलगा आपल्याच मातीत सोन्यासारखे पीक पिकवतोय."

गावासाठी अभिमानास्पद क्षण
काटी गावच्या या सुपुत्राने कृषी क्षेत्रात मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यात त्यांचे नाव गाजत आहे. या यशामध्ये हर्षवर्धन यांना त्यांचे वडील बाळासाहेब गुंड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शेतीला 'ग्लोबल' स्तरावर नेणाऱ्या या युवा शेतकऱ्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

आमच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा – 'Only न्युज धाराशिव'

Post a Comment

0 Comments