Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटगावच्या चिमुकल्यांनी जिंकली रसिकांची मने; मराठी शाळा वाचवण्याचा दिला प्रभावी संदेश! ऐतिहासिक विक्रमी कौतुक! स्नेहसंमेलनात काटगावच्या जिल्हा परिषद शाळेवर सव्वा लाखांच्या बक्षिसांचा वर्षाव; लोककलेचा जागर अन् सामाजिक प्रबोधन; काटगाव शाळेचा 'बालकला महोत्सव' दिमाखात संपन्न.

काटी/उमाजी गायकवाड 
इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावात मराठी शाळा टिकवणे हे एक आव्हान बनले असताना, तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काटगाव येथील विद्यार्थ्यांनी आपल्या अष्टपैलू सादरीकरणातून 'मराठी शाळा वाचवा' असा कळकळीचा संदेश दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन व बालकला महोत्सवात या चिमुकल्यांनी उपस्थितांची मने तर जिंकलीच, पण शाळेच्या इतिहासात तब्बल 1 लाख 25 हजार रुपयांच्या विक्रमी बक्षिसांची कमाई करून नवा आदर्श निर्माण केला.

दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी शाळेच्या प्रांगणात हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि मराठी भाषेचा सार्थ अभिमान जागृत व्हावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री. अशोक माळी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी श्री. मल्लीनाथ काळे, श्री. सुनील रोकडे, श्री. कचरू सगट, नूतन प.सं. सदस्य श्री. बालाजी शिंदे, मुख्याध्यापक श्री. विलास राठोड, उद्योजक श्री. इरफान पठाण, श्री. तानाजी बेटकर, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्री. नागेश स्वामी, केंद्रप्रमुख श्री. संजय वाले, श्री. मोहन भोसले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोककला आणि संस्कृतीचा अविष्कार
'देवा श्री गणेशा' या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पोवाडा, गोंधळ, भारुड, लावणी आणि गवळण यांसारख्या लोककलांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. 'शाळा माझी मराठी', छत्रपती शिवरायांचा पराक्रम, भीमगीत, कव्वाली आणि शेतकरी गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी संस्कृतीचे दर्शन घडवले. 'आजी व नात' ही नाटिका आणि 'माझी मैना गावाकडे राहिली' हे सादरीकरण विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले.

सामाजिक प्रबोधनावर भर
केवळ करमणूकच नव्हे, तर स्त्री-पुरुष समानता, 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' आणि धर्मनिरपेक्षता यांसारख्या गंभीर विषयांवर नाट्यरूपकातून प्रकाश टाकून विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जपले. श्रेया कोलते, वैष्णवी माळी, पृथ्वीराज हजारे, नर्गीस, आलिया यांच्यासह एकूण 240 बालकलाकारांनी यात सहभाग घेतला.

या यशस्वी आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सोमनाथ माळी, सर्व सदस्य, मुख्याध्यापक श्री. राजेंद्र लोहार आणि शिक्षक वृंदाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. राजेंद्र लोहार यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. महादेव गायकवाड यांनी प्रभावीपणे पार पाडले.

ठळक वैशिष्ट्ये:
या वार्षिक स्नेहसंमेलन व बालकला महोत्सवात ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींकडून सव्वा लाख रुपयांची देणगी व बक्षिसे,कलाविष्काराद्वारे मराठी माध्यमाचे महत्त्व अधोरेखित करणारा प्रभावी संदेश दिला व 
लोकसंस्कृतीचे जतन करत भारुड, गोंधळ आणि पोवाड्याचा बहारदार कार्यक्रम ही ठळक वैशिष्ट्ये ठरले.

आमच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा – 'Only न्युज धाराशिव'

Post a Comment

0 Comments