Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील युवकाचा पुण्यात अपघाती मृत्यू; उपचारादरम्यान निधन

काटी:तुळजापूर तालुक्यातील काटी येथील राहुल जगन्नाथ साळुंके (वय 44) यांचा पुण्यात झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवार, दि. 21 रोजी अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ Sassoon General Hospital, पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवार, दि. 24 रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

राहुल साळुंके हे नोकरीनिमित्त पुण्यात कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच काटी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 6 वाजल्यानंतर काटी येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना.

.                -स्व.राहुल जगन्नाथ साळुंके,काटी

Post a Comment

0 Comments