Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

कुंभारीत अखंड हरिनाम सप्ताह अन् ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा उत्साह; ३० व्या वर्षात पदार्पण, श्रीराम मंदिरात भक्तीचा जागर!

काटी /उमाजी गायकवाड 
आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील पुण्यभूमीत, श्रीराम नवमीचे औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याचे हे ३० वे वर्ष असून, संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण पसरले आहे.

ह.भ.प. बाळकृष्ण महाराज तांबे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा सोहळा शनिवार, दि. २१ मार्च २०२६ ते शनिवार, दि. २८ मार्च २०२६ या कालावधीत कुंभारी येथील श्रीराम मंदिरात पार पडणार आहे.

दैनंदिन धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
सप्ताहाच्या काळात पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ११ पारायण, दुपारी १२ ते २ भोजन आणि रात्री ९ ते ११ हरिकीर्तन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत 'जागर' करून विठ्ठल-रुक्मिणीचा नामघोष केला जाणार आहे.

दिग्गज कीर्तनकारांची उपस्थिती
या सात दिवसांच्या सोहळ्यात राज्यातील नामवंत कीर्तनकार आपली सेवा रुजू करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने ह.भ.प. सुरज महाराज कुंभार (कुंभारी),
ह.भ.प. एकनाथ महाराज हुरडे (सावरगाव),ह.भ.प. वैभव महाराज कान्हेगावकर (लोहारा),ह.भ.प. गणेश महाराज क्षीरसागर (कामठा),ह.भ.प. माऊली महाराज (मेंडसिंगा),ह.भ.प. शिवचरित्रकार केशव महाराज पवार (आळंदी),ह.भ.प. उत्तम महाराज गाटे (सारोळे)
यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.

सोहळ्याची सांगता: शनिवार, दि. २८ मार्च रोजी ह.भ.प. शाम महाराज जोशी (कासेगाव) यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने होणार आहे.

ग्रामस्थांचे अहोरात्र परिश्रम
या सोहळ्यासाठी समस्त कुंभारी ग्रामस्थ, भजनी मंडळ आणि तांबे परिवारासह विविध सेवाभावी भक्त परिश्रम घेत आहेत. दररोज सकाळी आणि संध्याकाळी विविध देणगीदारांकडून पंगतीचे (महाप्रसादाचे) आयोजन करण्यात आले आहे.

संसारातील दुःखाचा विसर पडून आत्मिक समाधान मिळावे, यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी या 'ज्ञानयज्ञाचा' लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ श्रीक्षेत्र कुंभारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

                   वृत्त संकलन: Only न्युज धाराशिव

तुम्हाला ही बातमी कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शेअर करा!
✍️ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा: 'Only न्युज धाराशिव'

Post a Comment

0 Comments