Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आरळी बु. प्रशालेत गुणवंतांचा जल्लोषात सत्कार; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी; एनएमएमएस यशस्वी विद्यार्थी व वक्तृत्व स्पर्धा विजेत्यांचा गौरव

तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा 
आरळी बु. (दि. 07) – तुळजापूर तालुक्यातील आरळी बु. सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आता राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्येही उल्लेखनीय यश संपादन करण्यास सुरुवात केली आहे. चालू शैक्षणिक वर्षात प्रशालेतील चार विद्यार्थ्यांनी एनएमएमएस (National Means-cum-Merit Scholarship) परीक्षेत मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

एनएमएमएस स्पर्धा परीक्षेत कु. शर्वरी प्रशांत पाटील (109 गुण), कु. आस्था जितेंद्र पारवे (104 गुण), कु. गायत्री बालाजी कचरे (98 गुण) व कु. प्रगती नामदेव व्हरकट (76 गुण) यांनी कोणत्याही खासगी शिकवणीशिवाय शाळेतील नियमित अभ्यास, सराव परीक्षा, त्याचे विश्लेषण व योग्य नियोजनाच्या बळावर उल्लेखनीय यश मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इयत्ता 1 ली ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चार गटांत वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणे सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तीन परीक्षकांनी परीक्षण करून सरासरी गुणांच्या आधारे विजेते निश्चित केले.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे –
गट क्र. 1 (इयत्ता 1 ली-2 री) : प्रथम – आरुष देशभूषण दुरुगकर, द्वितीय – आरोही ज्ञानेश्वर कोळी, तृतीय – वैभवी नितेश तानवडे.
गट क्र. 2 (इयत्ता 3 री-5 वी) : प्रथम – वैष्णवी बाबुराव उळेकर, द्वितीय – श्रद्धा सिद्राम आगलावे, तृतीय – आकांक्षा सुरेश चौगुले.
गट क्र. 3 (इयत्ता 6 वी-7 वी) : प्रथम – मनाली मारुती रणेपूजारी, द्वितीय – श्रद्धा दयानंद गुरव, तृतीय – गामिनी जनार्दन व्हरकट व मंजली पांडुरंग मुसळे.
गट क्र. 4 (इयत्ता 8 वी-9 वी) : प्रथम – स्वराली राजेश तेलंग, द्वितीय – आकांक्षा मोहन कचरे व अनुष्का अनिल बामनकर, तृतीय – प्रगती शशिकांत पारवे.
या सर्व विजेत्यांना एम. जी. पाटील डेव्हलपर्स ओ.पी.सी. प्रा. लि. यांच्या सौजन्याने ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच श्री सिद्राम शिवानंद तानवडे यांच्या सौजन्याने एनएमएमएस परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष मकरंद बामनकर, प्रशाला आरळी बु. व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामेश्वर तानवडे, उपाध्यक्ष किरण गायकवाड व मीनाक्षीताई भोसले, माजी सरपंच गोविंद पारवे,मयूर पारवे, नागेश सरडकर, अनिल बामनकर, दादा उळेकर, प्रशांत पाटील, नामदेव व्हरकट,जितेंद्र पारवे, मुख्याध्यापक विनायक बोदर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देशभूषण दुरुगकर, व्यवस्थापन समिती सदस्य अनिता उळेकर तसेच ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब घेवारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रमोद चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वाती कानडे, स्वाती जवळेकर, प्रीती अंबुरे, संकल्पना तांबे, राम मोटे, प्रकाश स्वामी, अक्षय जाधव, कांबळे मॅडम व रुपाली आगासे यांनी परिश्रम घेतले.

तुम्हाला ही बातमी कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शेअर करा!
✍️ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा: 'Only न्युज धाराशिव'

Post a Comment

0 Comments