Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

पांगरदरवाडीत भव्य ओपन जिमचे लोकार्पण; ग्रामस्थांना मिळाली व्यायामाची नवी सुविधा

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या भव्य ओपन जिमचे लोकार्पण गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. सिंधू कृष्णात पोफळे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या ओपन जिममुळे गावातील नागरिकांना व्यायामासाठी उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे. लहान मुले, महिला तसेच पुरुष या सर्वांना येथे नियमित व्यायाम करता येणार असून गावकऱ्यांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला यामुळे चालना मिळणार आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात शरीराकडे होणारे दुर्लक्ष टाळावे तसेच ग्रामस्थांचे आरोग्य सुदृढ राहावे, या उद्देशाने ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून ही ओपन जिम उभारण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला उपसरपंच सोमनाथ शिंदे, जेष्ठ नागरिक हणमंत मते, नागनाथ शेळके, नागनाथ मारडकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या भारतबाई निंबाळकर, कृष्णात पोफळे, गणेश गायकवाड, नानासाहेब चव्हाण, आण्णा मोरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

या उपक्रमामुळे पांगरदरवाडी गावात आरोग्यविषयक जागरूकता वाढून निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments