काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आयडिबीआय बँक, विजापूर रोड, सोलापूर यांच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून सुमारे तीन लाख रुपयांच्या विविध वैद्यकीय साहित्यांची भेट देण्यात आली. मंगळवार, दि. १० मार्च रोजी हा साहित्य हस्तांतरण कार्यक्रम पार पडला. या साहित्यामुळे आरोग्य केंद्रातील सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून रुग्णांना अधिक चांगल्या सेवा उपलब्ध होणार आहेत.
या उपक्रमांतर्गत रुग्णांसाठी पाच बेड, दोन एसी, दोन कपाटे, दोन व्हीलचेअर, बेबी केअर अल्ट्रा वेट मशीन तसेच संगणक व प्रिंटर अशी विविध साहित्ये प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली.
या प्रसंगी आयडिबीआय बँकेचे जनरल मॅनेजर एकनाथ जाधव, हेमंत गानग्गा, देबा त्रिपाठी, पंचायत समिती सदस्य संतोष दादा बोबडे, द्राक्षबागायतदार हणमंत गवळी, ज्येष्ठ पत्रकार यशवंत कुलकर्णी, राजकुमार पाटील, नागेश मोरे, संजय लिंगफोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, क्लार्क ढगे, आरोग्य सेवक वांजारे, चौधरी, झुंबडे, सरवदे, राहुल घोडके, श्रीमती शीतल वाडकर-विभुते, संजय रुपनर आदी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून आयडिबीआय बँकेच्या सामाजिक बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
0 Comments