धाराशिव | Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
1)शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवा: जिल्हयातील प्रगतिशील शेतकऱ्यांचे आवाहन; ड्रोन आणि 'एआय' आधारित शेती प्रयोगांची ग्रामीण भागात चर्चा.
2)मराठवाड्यात 2.88 लाख मराठा कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र – राज्य सरकारकडून मोठा निर्णय; OBC आरक्षणासाठी पात्रता वाढणार.
3)धाराशिव जिल्ह्यात भीषण अपघात – उमरगा परिसरात कारचे टायर फुटून चहाच्या टपरीत घुसली; माजी नगरसेवकासह दोघांचा मृत्यू.
4)नागपुरात इंधनटंचाईची अफवा – प्रशासनाचा खुलासा; पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, साठेबाजीवर पोलिसांची नजर.
5)शेअर बाजारात घसरण – सेन्सेक्स 1300 पेक्षा जास्त अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांमध्ये चिंता.
6)एसटी महामंडळाच्या 'स्मार्ट कार्ड' योजनेला प्रतिसाद: धाराशिव विभागातील हजारो प्रवाशांनी घेतला 'वन नेशन, वन कार्ड' सुविधेचा लाभ; प्रवासात सुलभता.
7)शिक्षण क्षेत्रात जिल्ह्याचा डंका: राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश.
8)पुणे आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनात धाराशिवचे उद्योजक अमरसिंह देशमुख यांच्या सन ग्रुपचा सहभाग:पुण्यात आयोजित एक्स्पोमध्ये जिल्ह्यातील स्थानिक उत्पादनांना मोठी मागणी;
उद्योजकांचा गौरव.
9)तुळजापूर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी: सुटीच्या निमित्ताने तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दाखल; प्रशासनाकडून चोख बंदोबस्त.
10)साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात: जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून विक्रमी ऊस गाळप; शेतकऱ्यांच्या थकीत बिलांबाबत हालचाली सुरू.
0 Comments