Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूरच्या भूमीत आमदार अबू असीम आझमी यांचे शाही स्वागत; रोचकरी परिवाराशी साधला स्नेहसंवाद!

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर/उमाजी गायकवाड
 समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ आमदार अबू असीम आझमी यांनी रविवारी (दि. २९) तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी तुळजापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष देवानंद (भाऊ) रोचकरी यांच्या निवासस्थानी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

रोचकरी परिवाराकडून भव्य सत्कार
आमदार अबू आझमी यांचे आगमन होताच रोचकरी परिवाराच्या वतीने त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष देवानंद (भाऊ) रोचकरी, समाजवादी पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष तथा अरळी बुद्रुक पंचायत समिती गणाचे सदस्य कृष्णा (भैय्या) रोचकरी आणि मंगरुळ जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित सदस्या सीमाताई माडजे-रोचकरी यांच्या हस्ते आझमी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

राजकीय घडामोडींवर खलबते
या भेटीला केवळ सदिच्छा भेटीचे स्वरूप नसून, आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही याकडे पाहिले जात आहे. कृष्णा (भैय्या) रोचकरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अरळी बुद्रुक पंचायत समिती गणातून कृष्णा भैय्या रोचकरी पंचायत समिती सदस्यपद व मंगरुळ जिल्हा परिषद गटातून सीमाताई माडजे-रोचकरी या बहिण भावांच्या निवडीमुळे समाजवादी पक्षाची ताकद वाढत असतानाच, अबू आझमी यांनी थेट रोचकरी यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने
बाळू (आप्पा) रोचकरी,भैरवनाथ माडजे,मुन्ना (मामा) साळुंके,विशाल रोचकरी, अलोक शिंदे, अक्षय गायकवाड
किरण अमृतराव, सुजित कोकाटे, ॲड.उदय भोसले,
मोहसीन खान, अमोल कोकाटे, बालाजी वटणे,धनू माने, ईश्वर बिराजदार, देवीदास तात्या, रितेश आदेकर, समाजवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव, खंडू कांबळे,अजय क्षीरसागर यांसह समाजवादी पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या भेटीमुळे धाराशिव जिल्ह्यासह तुळजापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
'Only न्युज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी!

Post a Comment

0 Comments