Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

उमरग्याच्या श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाला नवभारत टाईम्सचा 'उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार'!

 मुरुम | प्रतिनिधी
देशातील नामवंत वृत्तसंस्था नवभारत टाईम्स, दिल्ली तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ‘उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्कार’ उमरगा येथील श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला प्रदान करण्यात आला आहे.
हा मानाचा पुरस्कार आज छत्रपती संभाजीनगर येथे भव्य सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे अक्षय ऊर्जा व दुग्धविकास मंत्री मा. ना. अतुलजी सावे व आमदार श्री. विक्रमजी काळे यांच्या हस्ते संस्थेचे सचिव मा. श्री. रामकृष्णपंत खरोसेकर यांना देण्यात आला.

यावेळी आदर्श वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राम सोलनकर, श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य श्री. राम पेठकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
१० सप्टेंबर १९८४ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या ४०+ वर्षांत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यात संस्थेचे मोठे योगदान आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या दीर्घकाळच्या अथक प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

या अभिमानास्पद यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विनायकराव पाटील व सरचिटणीस, माजी मंत्री मा. श्री. बसवराज पाटील यांनी प्राचार्य, शिक्षक व सर्व कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांना "Only न्युज धाराशिव" च्या वतीने हार्दिक शुभेच्छा! हे यश उमरगा व धाराशिव जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

Post a Comment

0 Comments