Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सिंदगाव येथे अखंड हरिनाम ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह व रामकथा सोहळ्याचे आयोजन

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
सिंदगाव | उत्तम बनसगोळे
तुळजापूर तालुक्यातील मौजे सिंदगाव येथे अखंड हरिनाम ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह व रामकथा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडणार असून गावातील तसेच परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी पूजा, ज्ञानेश्वरी पारायण, हरिनाम सप्ताह, तसेच सायंकाळी रामकथा आणि कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. विविध मान्यवर कीर्तनकार व प्रवचनकार यांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिक रंगणार आहे.

या कार्यक्रमात श्री राम कथाकार म्हणून ह.भ.प. राम महाराज बोरीभुमकर (आष्टी) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच विविध दिवशी नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे. गावातील भजनी मंडळे आणि हरिभक्त मंडळींचाही सक्रिय सहभाग असणार आहे.

सप्ताहाच्या निमित्ताने दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गावातील ग्रामस्थ, युवक मंडळे आणि विविध सामाजिक संस्थांचे सहकार्य लाभत आहे.

Post a Comment

0 Comments