Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

Only न्युज धाराशिवच्या आजच्या सायंकाळच्या टॉप 7 हेडलाईन्स बातम्या

धाराशिव |Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 

१. धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा: हवामान विभागाने धाराशिवसह लगतच्या परिसरात पुढील २४ तासांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी शेतीमालाची सुरक्षितता करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

२. जिल्हा परिषदेत रिक्त जागांसाठी हालचाली: जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाकडून हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच या संदर्भातील अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याने उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

३. वारंवार खंडित विजपुरवठ्यामुळे तुळजापूर शहरात उद्या पाणीपुरवठा होणार नाही : तुळजापूर शहरात कालपासून वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाण्याची टाकी भरण्यास अडसर आल्याने उद्या बुधवारी होणारा पाणीपुरवठा होणार नाही. गुरुवारी पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल.--नगरपरिषद प्रशासन, तुळजापूर 

४) १० मार्च रोजी देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा चढ-उतार पाहायला मिळाला. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष बाजारातील घडामोडींवर लागले आहे. 

४. आरोग्य केंद्रांत 'मिशन मोड'वर लसीकरण: जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांवर आज 'मिशन मोड'वर लसीकरण मोहीम राबवण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिकांनी आरोग्य केंद्रांवर गर्दी केली होती, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता.

५. महामार्गावर अपघातांची मालिका; प्रशासन सतर्क: धाराशिव-सोलापूर महामार्गावर गेल्या २४ तासांत दोन मोठे अपघात झाल्यामुळे जिल्हा वाहतूक पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. आता महामार्गावर ठिकठिकाणी स्पीडगन आणि सीसीटीव्ही निगराणी वाढवण्यात आली आहे.

6) मार्च महिन्यात तापमानात वाढ; विदर्भ-मराठवाड्यात उष्णतेचा प्रभाव:मार्चच्या सुरुवातीपासून देशातील अनेक भागात तापमान वाढत असून काही राज्यांत उष्णतेची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमान वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

7) सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार; गुंतवणूकदारांचे लक्ष
१० मार्च रोजी देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा चढ-उतार पाहायला मिळाला. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष बाजारातील घडामोडींवर लागले आहे. 



Post a Comment

0 Comments