तुळजापूर|Only न्युज धाराशिव 
1)नराधम चुलत्याचे क्रौर्य! 13 महिन्यांच्या चिमुकलीचे कोयत्याने तुकडे करून जमिनीत पुरले.धाराशिवच्या गवळेवाडी येथे धक्कादायक घटना; मुलगी भावाची नाही या संशयावरून चुलत्याने हत्या केली, आरोपीला अटक. जिल्ह्यात खळबळ!

2)नवविवाहित जोडप्याचा भीषण अपघात; साखरपुड्यानंतर आठवडाभरातच दोघांचा मृत्यू
धाराशिवमध्ये तरुण जोडपे दुचाकीवरून अपघातग्रस्त; आठवडाभरापूर्वी साखरपुडा झाला होता, आता दोघेही एकत्रच शेवटच्या प्रवासाला.

3)कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे संकट; दर कोसळल्याने भूम तालुक्यात रोटर फिरवला
भूम तालुक्यात 1703 हेक्टरवर कांदा काढणी सुरू, पण बाजारभाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल; अनेकांनी उत्पादन नष्ट करण्यास सुरुवात.

4)झेडपी सत्तास्थापनेचा तिढा; एकनाथ शिंदेंकडून लक्ष, तानाजी सावंत गटाची भूमिका निर्णायक
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महायुतीत चर्चा सुरू; राणा पाटील-ज्ञानराज चौगुले यांची शिंदेंची भेट, 13 मार्चला निवडणूक?

5) राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला ट्रकची धडक; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी
कण्हेरी पाटी जवळ रात्री अपघात; पती-पत्नी गंभीर जखमी, पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू. महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.