Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

🟫 दुपारच्या Only न्युज धाराशिवच्या महत्वाच्या बातम्या 🟫. दुपारच्या सत्रातील Only न्युज धाराशिवच्या महत्वाच्या टॉप 5 बातम्या

तुळजापूर| Only न्युज धाराशिव 
आंतरराष्ट्रीय घडामोडी...
1.) अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध तीव्र: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर इराणने इस्रायल आणि गल्फ देशांवर (दुबई, अबू धाबी, दोहा) मोठ्या प्रमाणात मिसाइल आणि ड्रोन हल्ले केले. हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले, युद्ध आता लेबनॉनपर्यंत पसरले आहे.
2.) कुवेतमध्ये अमेरिकी विमाने कोसळली: इराणच्या हल्ल्यानंतर कुवेतमध्ये अमेरिकी लष्करी विमानांची क्रॅश झाली (काही विमाने), पण सर्व क्रू सदस्य सुखरूप बचावले. ट्रम्प यांनी सांगितले की, इराणवरील हल्ले आणखी  आठवड्यांपर्यंत चालू राहतील आणि अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील महत्वाची बातमी 
3). नागपूर स्फोट प्रकरण: नागपूरमधील भीषण स्फोटात मृतांचा आकडा 17 वर पोहोचला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली. भाजप आमदारांनी 75 लाख नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार होऊ देणार नसल्याचे सांगितले. पोलिसांनी मालकासह 21 जणांवर गुन्हा दाखल केला, 9 जण अटकेत.

धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी
4). धाराशिवमध्ये ड्रग्ज कारवाई: पोलिसांनी गारभवानी इंदिरा नगर झोपडपट्टीतून 14.5 ग्राम एमडी ड्रग्ज पावडर (20 पॉलीथिन पिशव्या) जप्त केली. आरोपी बालाजी नवनाथ सोनवनेला अटक.
5). कांदा दर कोसळल्याने शेतकरी हैराण: भूम तालुक्यात 1703 हेक्टरवर कांदा काढणी सुरू असताना दर कोसळले. शेतकऱ्याने रोटर फिरवून नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.

Post a Comment

0 Comments