Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

Only न्युज धाराशिव विशेष बातम्या. आजच्या महत्वाच्या पाच बातम्या

तुळजापूर/उमाजी गायकवाड 

1) १३ महिन्यांच्या चिमुकलीची क्रूर हत्या
धाराशिव जिल्ह्यातील गवळेवाडी येथे चुलत्यानेच १३ महिन्यांच्या मुलीला कोयत्याने तुकडे करून जमिनीत पुरले. मुलगी भावाची नसल्याच्या संशयातून ही घटना घडली असून, आरोपीला अटक झाली आहे. संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

2)अफूच्या अवैध शेतीवर पोलिसांची कारवाई
वाशी तालुक्यातील पाखरुड शिवारात अफूच्या शेतीवर मोठा छापा टाकण्यात आला. पोलिसांनी अवैध लागवड उघडकीस आणली असून, संबंधितांवर कारवाई सुरू आहे.

3)कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे संकट
भूम तालुक्यात १७०३ हेक्टरवर कांदा काढणी सुरू असताना दर कोसळले आहेत. शेतकऱ्यांनी रोटर फिरवून नाराजी व्यक्त केली असून, बाजारभाव कमी झाल्याने मोठे नुकसान होत आहे.

4)वीजबिल आणि कनेक्शन बंदीवर आमदारांचा दणका
आमदार कैलास पाटील यांनी जिल्ह्यातील अव्वाच्या सव्वा वीजबिल आणि हजारो कनेक्शन बंदीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांकडे लक्ष वेधले. स्मार्ट मीटरबाबत सीएम फडणवीस यांनी सभागृहात आदेश दिले आहेत.

5)वाशीमध्ये शेतरस्ते आणि महसूल प्रकरणांचा निपटारा
वाशी तालुक्यात वर्षभरात ९५ किमी शेतरस्ते मंजूर झाले असून, महसूल विभागाने ५४ प्रकरणे मार्गी लावली आहेत. शासन धोरण आणि अधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे स्थानिक समस्या सोडवल्या जात आहेत.

Post a Comment

0 Comments