"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
धाराशिव | उमाजी गायकवाड
जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणार्या धाराशिवमधील नामांकित 'सन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज'च्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. पवनसुत हनुमान जयंतीचे औचित्य साधून गुरुवार, २ एप्रिल २०२६ रोजी 'सन ग्रॅनाईट अँड मार्बल' या भव्य शोरूमचा शुभारंभ डीआयसी रोड, काकडे प्लॉट येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीत भर टाकणारा हा उपक्रम धाराशिवकरांच्या पसंतीस उतरत आहे.
प्रतिकूलतेतून यशाचा 'सूर्योदय'
धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील तुळजापूर तालुक्यातील काटी येथील देशमुख बंधूंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत उद्योजकता क्षेत्रात आपले नाव कोरले आहे. 'मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही' हा समज मोडीत काढत, सन ग्रुपने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन केला. सन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा अमरसिंह बाजीराव देशमुख व संपूर्ण देशमुख परिवार (काटीकर) यांच्या दूरदृष्टीमुळे आज हा समूह वटवृक्षाप्रमाणे विस्तारला आहे.
एकाच छताखाली बांधकामाचे संपूर्ण समाधान
सन ग्रुपने आजवर दर्जेदार सेवा आणि गुणवत्तेच्या जोरावर बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नूतन 'सन ग्रॅनाईट व मार्बल'च्या निमित्ताने आता दर्जेदार आणि आकर्षक दगडांचे वैविध्य धाराशिवकरांना उपलब्ध झाले आहे. यापूर्वी या समूहाने
सन ग्लास आणि अल्युमिनियम,सन प्लाय आणि फर्निचर,सन पेंट, हार्डवेअर व प्लंबिंग,सन इलेक्ट्रिकल या क्षेत्रांत आपली मोहर उमटवली आहे. आता ग्रॅनाईट आणि मार्बल क्षेत्रातही हा समूह क्रांती करण्यास सज्ज झाला आहे.
मान्यवरांची मांदियाळी आणि सोहळा
उद्घाटन सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यवसायाचे नूतन दालन पाहण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.
याप्रसंगी रणजीत रणदिवे, प्रदीप खामकर, रवी जाधव, विश्वजीत देशमुख, अभिजीत देशमुख, गजानन देशमुख, प्रदीप देशमुख, नाना देशमुख, सुभाष पाटील, प्रा. अभिमान हंगरगेकर, प्रा. डॉ. टी. एल. बारबोले, गोरोबा लोंढे, दिलीप पवार, नवनाथ ढगे, अमोल भोसले यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन उद्योग समूहातील सर्व सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी या सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते.
"गुणवत्ता आणि ग्राहकांचे समाधान हेच आमच्या यशाचे गमक"
"गुणवत्ता आणि ग्राहकांचे समाधान हेच आमच्या यशाचे गमक आहे. 'सन ग्रॅनाईट व मार्बल'च्या माध्यमातून आम्ही धाराशिवकरांना सर्वोत्तम दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत."
— अमरसिंह बाजीराव देशमुख (संस्थापक, सन ग्रुप)
0 Comments