Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काळे कुटुंबीयांवर आलेल्या दुःखात सोलापूरचे भाजप नेते झाले सहभागी; भाजप नेते शहाजी (भाऊ) पवार आणि राजकुमार पाटील यांच्याकडून ॲड.अनिल काळे यांचे सांत्वन

काटी | "Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांच्या मातोश्री कै. सुभद्राबाई काळे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. या पार्श्वभूमीवर, सोलापूर येथील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष मा. शहाजी (भाऊ) पवार आणि सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष मा. राजकुमार पाटील (अकलूज) यांनी केमवाडी येथे काळे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

दिनांक १३ मार्च २०२६ रोजी कै. सुभद्राबाई काळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. या दुःखद प्रसंगामुळे काळे परिवारावर ओढवलेल्या संकटात सहभागी होत, पवार आणि पाटील यांनी काळे कुटुंबीयांची भेट घेऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी कै. सुभद्राबाई काळे यांच्या स्मृतींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी उपस्थित मान्यवर:
या सांत्वनपर भेटीदरम्यान सुनील भाऊ काळे, बाबासाहेब काशिद, बालाजी काळे, मनोज काशिद, मधुकर खोत पाटील, बाबासाहेब काळे, प्रकाश काळे, रामा इटूकडे, सचिन काळे यांच्यासह ग्रामस्थ आणि भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments