Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापुरात भाविकांनो सावधान! मंदिर परिसरात थुंकल्यास किंवा कचरा टाकल्यास ऑन द स्पॉट ५०० रुपयांचा दंड; नियम मोडणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनाची 'Special-2' पथके तैनात; दोन शिफ्टमध्ये चालणार कडक कारवाई; सुरक्षारक्षक आणि शिपायांचा ताफा मैदानात


Only न्यूज धाराशिव वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी माता मंदिर परिसरात आता अस्वच्छता करणाऱ्यांची खैर असणार नाही. मंदिर परिसरात स्वच्छता आणि पावित्र्य राखण्यासाठी मंदिर प्रशासनाने एक मोठा आणि कडक निर्णय घेतला आहे. मंदिर परिसरात कुठेही थुंकताना अथवा कचरा टाकताना आढळल्यास संबंधितांवर तब्बल ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन होत असल्याने अखेर मंदिर संस्थानने हे कडक पाऊल उचलले आहे.

स्वच्छतेसाठी 'ॲक्शन मोड'; दोन विशेष पथके तैनात
मंदिर संस्थानकडून भाविकांना सातत्याने परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले जात होते. मात्र, काही बेजबाबदार व्यक्तींकडून मंदिर परिसरात थुंकणे आणि कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या प्रकारांना चाप लावण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने दोन विशेष विशेष पथकांची (Squads) स्थापना करण्यात आली आहे.

सकाळी ६ ते रात्री १०... असा असेल 'वॉच'
ही कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी मंदिर संस्थानच्या सहायक स्वच्छता निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथके कार्यरत करण्यात आली आहेत. ही पथके दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तैनात असणार आहेत:

पहिली शिफ्ट: सकाळी ६:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत

दुसरी शिफ्ट: दुपारी २:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत

असे असेल कारवाई करणाऱ्या पथकाचे स्वरूप:
या विशेष पथकांमध्ये मंदिर संस्थानचे ४ शिपाई आणि सुरक्षा सेवा पुरवणारी नामांकित कंपनी 'SISPL' चे २ सुरक्षारक्षक यांचा समावेश आहे. हे कर्मचारी मंदिर परिसरा कोपऱ्यान्-कोपऱ्यावर बारीक लक्ष ठेवून असतील.

प्रशासनाचे भाविकांना आवाहन
श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक देशभरातून येत असतात. मंदिराचे पावित्र्य आणि स्वच्छता राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिर प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे आणि कुठेही कचरा अथवा घाण न करता डस्टबीनचा वापर करावा, असे जाहीर आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, या आवाहनानंतरही जे नियम मोडतील, त्यांच्या खिशाला ५०० रुपयांचा थेट फटका बसणार हे आता नक्की!

Post a Comment

0 Comments