Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे महिला शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप;राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत उपक्रम; खरीप हंगामाच्या पूर्वतयारीनिमित्त बीजप्रक्रिया मार्गदर्शन

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलअंतर्गत निवड झालेल्या महिला शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर प्रमाणित सोयाबीन बियाण्यांचे नुकतेच वाटप करण्यात आले. मंडळ कृषी कार्यालय (काटी) आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया (गळीतधान्य – सोयाबीन) योजनेअंतर्गत स्थानिक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, या उद्देशाने या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

या मोहिमेदरम्यान लाभार्थी महिला शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून या मोफत दर्जेदार बियाण्यांचा लाभ घेतला. शासनाच्या या योजनेमुळे परिसरातील शेतकरी बांधवांना ऐन पेरणीच्या तोंडावर उत्कृष्ट दर्जाचे व प्रमाणित बियाणे उपलब्ध झाले असून, यामुळे चालू खरीप हंगामातील उत्पादनात मोठी वाढ होईल, असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. बियाणे वाटपासोबतच उपस्थित शेतकऱ्यांना पेरणीपूर्व बीजप्रक्रिया आणि आधुनिक पेरणी पद्धतीचे सविस्तर मार्गदर्शनही करण्यात आले.

उत्पादन वाढीसाठी दर्जेदार बियाणे महत्त्वाचे
शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. दर्जेदार बियाण्यांच्या वापरामुळे पिकांची प्रत सुधारेल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल. योजनेचा लाभ घेतलेल्या सर्व शेतकरी महिलांचे कृषी विभागाकडून अभिनंदन करण्यात आले असून आगामी हंगामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी उप कृषी अधिकारी आनंद पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी सुमित कापसे, कृषी प्रशिक्षणार्थी सुर्याजी चिवरे तसेच काटी सोसायटीचे चेअरमन संजय रामचंद्र साळुंके आणि सेक्रेटरी संजय साळुंके उपस्थित होते. याशिवाय संजय आदलिंगे, चंद्रकांत काटे, गोवर्धन गाटे, राजेंद्र गाटे, सतीश चिवरे, चव्हाण यांच्यासह तनुजा चिवरे, मिलन जाधव, मनिषा गाटे, स्वाती वाडकर या महिला शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments