Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा!आंतरराष्ट्रीय स्तरावर तुळजापूरचा डंका!सैनिकी विद्यालयाच्या प्राचार्यांना अमेरिकेची 'डॉक्टरेट' पदवी; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान!

तुळजापूर | "Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
शैक्षणिक क्षेत्रातील अविरत सेवा, शिस्तबद्ध प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित असलेले श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य श्री. वैजनाथ घोडके यांच्या कार्याची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाबद्दल अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका’ कडून त्यांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ (D.Sc.) ही मानद पदवी प्रदान करून गौरवण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्याची दखल
डॉ. एस. राधाकृष्णन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर (ऑल इंडिया टीचर्स वेल्फेअर असोसिएशन) यांच्या विशेष शिफारशीनुसार प्राचार्य घोडके यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील सैनिकी विद्यालयाला शिस्त आणि प्रगतीची नवी दिशा देण्यात घोडके यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या याच निष्ठेची फलश्रुती म्हणून हा आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान संपन्न
धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष मा. श्री. किर्ती किरण पुजार (IAS) यांच्या शुभहस्ते आणि मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्रीमती माया माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी प्राचार्य घोडके यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

“हा सन्मान केवळ माझा नसून श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय परिवाराचा आणि जिल्ह्याचा गौरव आहे. या पदवीमुळे शैक्षणिक क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.”
— डॉ. वैजनाथ घोडके (प्राचार्य, श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय)

सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान संचलित या विद्यालयाचा नावलौकिक वाढवणाऱ्या प्राचार्य घोडके यांच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि जिल्ह्यातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या यशामुळे सैनिकी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा – 'Only न्युज धाराशिव'!

Post a Comment

0 Comments