Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

🔱 भक्तीची श्रीमंती! तुळजाभवानी मातेच्या चरणी ३ लाखांची देणगी अर्पण 🔱

तुळजापूर | "Only  न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
हाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात भक्तीची आणखी एक सुवर्ण नोंद झाली आहे. कर्नाटक राज्यातील बीदर जिल्ह्यातील नांदगाव (ता. हुमनाबाद) येथील निस्सीम भक्त मल्लिकार्जुन कलगी यांनी आज देवीच्या चरणी तब्बल ३ लाख रुपयांची उदार देणगी अर्पण करत आपल्या श्रद्धेची प्रचिती दिली.
मल्लिकार्जुन कलगी हे विशेषतः तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते. अत्यंत भक्तिभावाने देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिर संस्थानकडे ही देणगी सुपूर्द केली. त्यांच्या या उदात्त कृतीमुळे मंदिर परिसरात भक्ती आणि कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने मल्लिकार्जुन कलगी यांचा देवीची आकर्षक प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचा हा सुंदर संगम तुळजाभवानी मातेच्या दरबारात पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला!

Post a Comment

0 Comments