" Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
मुरुम | प्रतिनिधी
नाईक नगर आश्रम शाळेमध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात भास्कर पवार सर यांच्या हस्ते बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यानंतर शिवकुमार मठपती सर यांनी विद्यार्थ्यांना बसवेश्वरांच्या जीवनकार्याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी बसवेश्वरांनी दिलेला समानता, बंधुता, सत्य आणि समाजसुधारणेचा संदेश स्पष्टपणे मांडला. त्यांच्या विचारांचे आजच्या काळात असलेले महत्त्वही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
या कार्यक्रमाला विठ्ठल ठाकरे सर, दत्ता राठोड सर, भूषण पाताळे सर तसेच मारुती येळणी मामा आणि निखिल राठोड यांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील आयुष्यात चांगले कार्य करण्यासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी बसवेश्वरांच्या आदर्शांचा अवलंब करून समाजात आदर्श नागरिक बनण्याचा संकल्प केला. अशा प्रकारे हा कार्यक्रम ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.
0 Comments