Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

ॲड.अनिल काळे यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना! आमदार पाटील यांनी ॲड.अनिल काळे यांची भेट घेत केले सांत्वन


"Only न्युज धाराशिव वृत्तसेवा 
काटी | प्रतिनिधी 
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांच्या मातोश्री कै. सुभद्राबाई काळे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. या दुःखद बातमीने काळे परिवारावर शोककळा पसरली असून, या कठीण काळात तुळजापूर विधानसभेचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केमवाडी येथे काळे यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

दिनांक १३ मार्च २०२६ रोजी कै. सुभद्राबाई काळे यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या भेटीदरम्यान काळे कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. "सुभद्राबाईंचे जाणे हे कुटुंबासाठी न भरून येणारे नुकसान आहे," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

हे मान्यवर होते उपस्थित:
या सांत्वन भेटीच्या प्रसंगी आमदार पाटील यांच्यासोबत सभापती विक्रमसिंह देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, बाबासाहेब काशिद, अरुण खोत, बालाजी काळे, रवि काळे, श्रीकांत धावणे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनीच काळे परिवारावर ओढवलेल्या या संकटात सहभागी होत आपल्या संवेदना व्यक्त केल्या.


Post a Comment

0 Comments