Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापुरात 'क्रांतीसूर्य' महात्मा बसवेश्वर जयंतीचा जल्लोष; विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन; महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांना तुळजापूरकरांकडून वंदन; समाजबांधवांची मोठी उपस्थिती


तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा 
बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक आणि क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती आज तुळजापूर शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. शहराच्या विविध भागांत, शासकीय कार्यालयांत आणि सामाजिक संघटनांच्या वतीने प्रतिमा पूजन करून या महामानवाला अभिवादन करण्यात आले.

महात्मा बसवेश्वर चौकात प्रतिमेचे पूजन 
नळदुर्ग रोडवरील महात्मा बसवेश्वर चौक येथे जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी आणि विशाल रोचकरी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

वीरशैव जंगम मठात त्रि-पुरुषांना अभिवादन
 येथील वीरशैव जंगम मठात आयोजित कार्यक्रमात सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक गौरीशंकर साखरे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

मान्यवरांची उपस्थिती: या सोहळ्याला ॲड. गिरीश शेटे, गुरुनाथ बडुरे, महाबळेश्वर तोडकरी, प्रफुल्ल मस्के, विश्वनाथ शेटे, महादेव तोडकरी, कैलास मस्के, सचिन नाडापुडे, लक्ष्मण उळेकर, ॲड. मंगेश नाडापुडे, मनोज गवळी, नागेश लकशेट्टी, भारत कोप्पा, राजू धरणे, नागनाथ गिराम, अभिषेक कोरे, हनुमंत भुजबळ, महेश नडमने, राहुल साखरे, पवन कोरे, प्रसाद वाले, विठ्ठल हुच्चे, प्रदीप कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिलांचा सहभाग लक्षणीय: 
कार्यक्रमात महिला भाविकांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात दिसून आला. ॲड. अंजली साबळे, अस्मिता शेटे, वैशाली धरणे, शुभांगी करीशेट्टी, राजश्री धरणे, हिराबाई उळेकर, वैशाली बडूरे, प्रियांका मस्के, विजया शेटे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासकीय कार्यालयांतही उत्साहाचे वातावरण 
तुळजापूर नगरपरिषद कार्यालयात उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, नगरसेवक पंडितराव जगदाळे आणि विशाल रोचकरी यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय शहरातील विविध शासकीय कार्यालये आणि सामाजिक संघटनांच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे स्मरण करत जयंती साजरी करण्यात आली.

'Only न्युज धाराशिव' – जिल्ह्यातील घडामोडींचा अचूक वेध!

Post a Comment

0 Comments