Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

​धाराशिवमध्ये अवतरणार हुबेहूब अयोध्या नगरी! तुळजापुरातील ऐतिहासिक शाही विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा; महेश पुजारी यांच्या लग्न सोहळ्यासाठी वंश पॅलेस नटले; शक्ती आणि भक्तीचा अपूर्व संगम! प्रभू श्रीराम अन् आई भवानीच्या साक्षीनं महेश-ऋतुजा यांचा विवाह सोहळा; तुळजापुरात पुजारी व रोचकरी यांच्या लग्न सोहळ्यात साकारली 'अयोध्या नगरी'. जिल्ह्यात प्रथमच! तुळजापुरात साकारली भव्य अयोध्या नगरी; गणेश पुजारींची संकल्पना, धाकट्या भावाच्या लग्नासाठी खास तयारी

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
​तुळजापूर | उमाजी गायकवाड
​ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा असलेल्या तुळजापूर शहरात सध्या एका शाही विवाह सोहळ्याची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे. निमित्त आहे, तुळजापूर येथील प्रतिष्ठित पुजारी बंधू आणि नळदुर्ग रोडवरील भव्य 'वंश पॅलेस'चे संचालक चि. महेश विश्वनाथ पुजारी यांचा विवाह सोहळा. या सोहळ्याचे औचित्य साधून वंश पॅलेस परिसरात थेट 'अयोध्या नगरी' साकारण्यात येत आहे, जी धाराशिव जिल्ह्यात प्रथमच जवळपास दोन एकरात हा दिमाखदार लग्न पाहायला मिळणार आहे.

​रामायण आणि तुळजाभवानीचे प्राचीन नाते
तुळजापूर ही आदिमाया आई तुळजाभवानीची पावन भूमी आहे. पौराणिक कथेनुसार, प्रभू श्रीराम जेव्हा माता सीतेच्या शोधात होते, तेव्हा त्यांनी तुळजापूर क्षेत्रात वास्तव्य केले होते. संकटकाळात आदिमायेने त्यांना आशीर्वाद दिला आणि राम-रावण युद्धात विजयाचा मार्ग प्रशस्त केला. प्रभू श्रीराम आणि आई तुळजाभवानीचे हे प्राचीन आणि आध्यात्मिक नाते या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा उलगडले जाणार आहे.

​अयोध्या नगरीचा विलोभनीय देखावा
वर चि. महेश यांचे थोरले बंधू तथा पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश विश्वनाथ पुजारी यांच्या संकल्पनेतून हा भव्य आणि विलोभनीय 'अयोध्या नगरी'चा देखावा साकारला जात आहे. मागील पाच दिवसांपासून दोनशेहून अधिक कामगार रात्रंदिवस मेहनत घेत आहेत आणि हे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

​या भव्य देखाव्यात डाव्या बाजूला आई तुळजाभवानीची मूर्ती, मध्यभागी प्रभू श्रीरामाची मूर्ती, तर उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांची देखणी मूर्ती स्थापन केली जाणार आहे. तसेच दोन्ही बाजूला सुंदर गरुडपक्ष्यांच्या मूर्ती साकारल्या जाणार आहेत. तसेच अयोध्या मंदिराच्या दोन्ही बाजूला आकर्षक हत्ती असणार आहेत. तसेच मंदीरासमोर आकर्षक रंगीबेरंगी चार पाण्याचे कारंजे (फाऊंटन) सगळ्यांचे लक्ष वेधून घेणार आहेत.

रामायणातील विविध व्यक्तिरेखा आणि चित्राकृतींनी हा देखावा अधिक विलोभनीय बनवण्यात येत आहे. आकर्षक ७०० फोकसच्या माध्यमातून विद्युत रोषणाईने वंश पॅलेस परिसर जगमटला आहे.

​मान्यवरांची उपस्थिती आणि चोख व्यवस्था
पुजारी बंधूंचे नळदुर्ग रोडवर तीन मोठे मंगल कार्यालय असल्यामुळे त्यांचे अनेकांशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे या शाही विवाह सोहळ्यासाठी राज्यभरातील अनेक राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. येणाऱ्या सर्व नातेवाईक, मित्र मंडळी आणि खास निमंत्रित पाहुण्यांच्या गाड्यांसाठी तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

​स्नेह भोजनाची व्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आली असून, पाहुण्यांना कोणत्याही प्रकारचा अडसर येऊ नये यासाठी बाहेरून अनुभवी वाडप्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वतः गणेश पुजारी आणि त्यांचे वडील विश्वनाथ पुजारी या सर्व तयारीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या कार्यक्रमासाठी पुजारी नगर मधील सर्व सदस्य,मित्र परिवार, नातेवाईक, कुटुंबातील सदस्यांसह जवळपास दोनशे कामगार या लग्न सोहळ्याच्या तयारीत आपला सहभाग नोंदवत आहेत.

​विवाह सोहळ्याचे तपशील (लग्न पत्रिकेनुसार)
वर: चि. महेश (श्री विश्वनाथ नवनाथ पुजारी यांचे द्वितीय सुपुत्र, नातू कै. नवनाथ लिबाजी पुजारी)

​वधू: चि.सौ.का. ऋतुजा (श्री अनिल नारायणराव रोचकरी यांचे सुकन्या, नात कै. नारायण हरिश्चंद्र रोचकरी)

​विवाह वेळ: मंगळवार, दि. २१/०४/२०२६ रोजी सायंकाळी ६ वा. ३७ मि. (शुभ मुहूर्त)

​विवाह स्थळ: वंश पॅलेस, पुजारी नगर, नळदुर्ग रोड, तुळजापूर

​हळदी समारंभ: सोमवार, दि. २०/०४/२०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता (विवाह स्थळी)

​निमंत्रक: समस्त पुजारी व रोचकरी परिवार

या देखण्या आणि ऐतिहासिक विवाह सोहळ्याची सध्या धाराशिव जिल्हाभर मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

'Only न्युज धाराशिव' - थेट आणि सत्य बातमी!

Post a Comment

0 Comments