"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
मोहोळ | विशेष प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, मोहोळ येथे आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र आणि महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. जनक मोतीलाल पवार यांना 'प्रशासकीय आदर्श कर्मचारी पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. या सन्मानामुळे पाडोळी (आ) गावासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली आहे.
दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न
पंचशील क्रीडा शिक्षण व सांस्कृतिक विकास मंडळ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मोहोळ विधानसभेचे आमदार माननीय राजू खरे आणि आरपीआयचे (आठवले गट) राज्य उपाध्यक्ष श्री. बापूसाहेब जगताप यांच्या शुभहस्ते श्री. पवार यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि भारतीय संविधान देऊन सन्मानित करण्यात आले.
कर्तव्यनिष्ठेची पावती
श्री. जनक पवार हे महावितरणच्या नरखेड शाखा कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. वीज ग्राहकांना तत्पर सेवा देणे आणि तांत्रिक कामांमधील त्यांची अचूकता व प्रामाणिकपणा याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 'प्रशासकीय सेवेत जनहित केंद्रस्थानी ठेवून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा असा गौरव इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो,' असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने
श्री. सुरेश माने (माजी कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग),आयु. शारदाताई गजभिये (प्रसिद्ध बौद्ध धर्म प्रचारिका),सुशील (भैय्या) क्षीरसागर (नगरसेवक, भाजप),जितेंद्र बनसोडे (अध्यक्ष, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र),शशिकांत ठोकळे (अध्यक्ष, पंचशील क्रीडा मंडळ),कुमार ढवळे (सामाजिक कार्यकर्ते) तसेच
याप्रसंगी मोहोळ नगर परिषदेचे सर्व नगरसेवक हनुमंत भडकवाड,धनंजय जगताप,अशोक पाचकुडे,विशाल रोडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. जनक पवार यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
0 Comments