Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सिंहासन पूजा नोंदणीला १९ ऑगस्टपासून प्रारंभतुळजाभवानी मंदिर संस्थानचा निर्णय; ऑनलाइन पद्धतीने नोंदणीची सुविधा

तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
 महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यासह कर्नाटक, तेलंगणा व इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येतात. देवीची सिंहासन पूजा ही भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने सप्टेंबर २०२६ या महिन्यातील सिंहासन पूजेची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.

भाविकांनी संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावरून सिंहासन पूजेची नोंदणी करावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.
https://online.shrutuljabhavani.org या संकेतस्थळावरून नोंदणी करता येणार आहे.

सिंहासन पूजा नोंदणीसाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन प्रक्रिया सुरू होणार असून २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत नोंदणी करता येईल. त्यानंतर निवड झालेल्या भाविकांना टप्प्याटप्प्याने ऑनलाइन पेमेंटसाठी एसएमएस पाठविण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एसएमएस पाठविला जाईल. त्यानंतर त्याच दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पहिल्या सोडतीतील भाविकांना ऑनलाइन पेमेंट करता येईल. सिंहासन पूजा संख्या पूर्ण न झाल्यास २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दुसऱ्या सोडतीसाठी एसएमएस पाठविण्यात येईल. दुसऱ्या सोडतीतील पेमेंटसाठी २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत मुदत असेल.

त्यानंतरही सिंहासन पूजा संख्या पूर्ण न झाल्यास २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता तिसऱ्या सोडतीतील भाविकांना एसएमएस पाठविण्यात येणार असून, त्यांना ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत ऑनलाइन पेमेंट करता येईल. सप्टेंबर २०२६ मधील अंतिम सिंहासन पूजा बुकिंग झालेल्या भाविकांची यादी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

भाविकांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाइन नोंदणी करून सिंहासन पूजेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments