तुळजापूर | 'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांकडून वेळोवेळी श्रद्धेने विविध मौल्यवान वस्तू अर्पण केल्या जातात. याच श्रद्धेतून कर्नाटक राज्यातील बीदर येथील भाविक प्रणय बेमलखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी तब्बल २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा सुबक व आकर्षक चांदीचा पाळणा अर्पण केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणय बेमलखेडकर हे आज आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. देवीचे भावपूर्ण दर्शन घेतल्यानंतर त्यांनी हा २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा मंदिर प्रशासनाकडे सुपूर्द करत देवीच्या चरणी अर्पण केला.
या भक्तिमय प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने प्रणय बेमलखेडकर यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या वेळी अमोल कर्डिले, महेश गंजे यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी आणि इतर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीदर येथील या भक्ताच्या अनोख्या दातृत्वाची आणि श्रद्धेची तुळजापूर शहर व परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
0 Comments