Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजाभवानी मंदिरात नागपंचमीचा भक्तिमय जागर; पारंपरिक उत्साहात सण साजरा


तुळजापूर | ' Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
श्री तुळजाभवानी मंदिरात नागपंचमीचा सण आज पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यंदा श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी असा दुहेरी योग आल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

नागपंचमीनिमित्त मंदिरातील होमकुंडासमोर नागदेवतेची पूजा करण्यासाठी सकाळपासूनच स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रथेनुसार होमासमोर भवानी-शंकराचा पितळी नागफणा मांडण्यात आला. त्यासमोर चिखलाची नागदेवता तयार करून विधिवत पूजा करण्यात आली.

महिलांनी नागदेवतेला दूध, लाह्या तसेच उकडलेले कानवले अर्पण करून श्रद्धेने पूजा केली. सायंकाळी मंदिर परिसरात महिलांनी फेर, भुलई यांसारखे पारंपरिक खेळ खेळत नागपंचमीचा उत्साह द्विगुणित केला. प्रथेनुसार सायंकाळी ५ ते ६ या वेळेत एक तास मंदिरातील पुरुषांचा प्रवेश बंद ठेवण्यात आला.
दरम्यान, सायंकाळी चौघडा वाद्याच्या गजरात नागदेवतेची उत्तरपूजा पार पडली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने नागदेवतेचे कल्लोळ तीर्थामध्ये विसर्जन करण्यात आले.

यावेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सौमय्याश्री पुजार, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, नागेश शितोळे, सहायक सुरक्षा निरीक्षक ऋषभ रेहपांडे यांच्यासह मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

परंपरा, श्रद्धा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम घडवत तुळजाभवानी मंदिरात नागपंचमी उत्साहात पार पडली.

Post a Comment

0 Comments