Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

सामाजिक बांधिलकी : एकलव्य विद्या संकुलातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार; मंगरूळ- यमगरवाडी येथे विद्यार्थ्यांना 'स्कूल किट'चे वाटप; आय.के.एस. हेल्थ व सेवा सहयोग फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

यमगरवाडी-मंगरुळ:येथील एकलव्य विद्या संकुलात विद्यार्थ्यांना 'स्कूल किट'चे वाटप करताना भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह विवेकजी अयाचित, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, शिक्षकवृंद व उपस्थित विद्यार्थी.

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
आय.के.एस.हेल्थ सेवा सहयोग फाउंडेशन (मुंबई) आणि देवीदासजी पाठक (धाराशिव) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील यमगरवाडी-मंगरूळ येथील ‘एकलव्य विद्या संकुल’मधील गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत 'स्कूल किट'चे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे कार्यवाह विवेकजी अयाचित यांच्या शुभहस्ते इयत्ता ५ वी, ६ वी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांना या स्कूल किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये शालेय पाठीवरचे दप्तर, वह्या आणि दैनंदिन अभ्यासासाठी लागणारे सर्व आवश्यक शैक्षणिक साहित्य समाविष्ट आहे.

याप्रसंगी बोलताना विवेकजी अयाचित यांनी सामाजिक संस्थांच्या अशा उपक्रमांमुळे ग्रामीण व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोठी मदत होते असे प्रतिपादन केले. सेवा सहयोग फाउंडेशन व IKS Health यांच्या या दातृत्वाबद्दल भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान, विद्यालयातील शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अशोक बनकर, अनिल घुगे, प्रणिता शेटकर, माधव पाटील, संतोष शितोळे, कोंडीबा देवकर, दत्ता भोजने यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments