तुळजापूर | Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत रोचकरी कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविला. माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांचे नातू आणि गणेश देवानंद रोचकरी यांचे चिरंजीव कु. दक्षराज गणेश रोचकरी याचा वाढदिवस आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला.
या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद गरजू विद्यार्थ्यांसोबत वाटून घेतल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत दक्षराज गणेश रोचकरी याचा वाढदिवस साजरा करताना उपस्थित मान्यवर. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
लहान वयातच मुलांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी, तसेच वैयक्तिक आनंदाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची ही कल्पना उपस्थितांनीही कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
यावेळी आलोक शिंदे, अक्षय गायकवाड, अमृतराव, सुशांत सपाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत वाटून घेण्याच्या या उपक्रमामुळे दक्षराजचा वाढदिवस संस्मरणीय ठरला.
0 Comments