Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य: माजी उपसभापती दत्ता शिंदे यांच्याकडून १५०० वह्यांचे वाटप; तामलवाडी गणातील सात गावांतील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

🇳🇪स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून काटी परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करताना माजी उपसभापती दत्ता (भैय्या) शिंदे. प्रसंगी ज्ञानेश्वर जगताप, समाधान गायकवाड, मारुती रोकडे, निरंजन करंडे, मुख्याध्यापक वाघमारे सर व इतर मान्यवर.

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तुळजापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. दत्ता (भैय्या) शिंदे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना १५०० वह्यांचे वाटप करण्यात आले. तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पंचायत समिती गणातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा थेट लाभ झाला.

स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर शैक्षणिक साहित्याचा आनंद फुलवण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत तामलवाडी, पिंपळा खुर्द, पिंपळा बुद्रुक, देवकुरुळी, सुरतगाव, सांगवी (काटी) या सात गावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक व थेट स्वरूपात दीड हजार वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

तामलवाडी येथे आयोजित मुख्य कार्यक्रमास श्री. दत्ता (भैय्या) शिंदे यांच्यासह ज्ञानेश्वर जगताप, समाधान गायकवाड, मारुती रोकडे, निरंजन करंडे, शिवाजी पाटील, वसीम पटेल, अजित अवताडे, इसाली शेख, कृष्णा घोटकर, नागेश शिंदे, मुख्याध्यापक वाघमारे सर, विठ्ठल नरवडे सर तसेच परिसरातील शाळांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती मिळावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments