Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजाभवानी देवीच्या 'सिंहासन पूजे'साठी १९ जुलैपासून ऑनलाईन नोंदणी; मंदिर संस्थानकडून वेळापत्रक जाहीर;ऑगस्ट महिन्यातील पूजेचे नियोजन: पारदर्शकतेसाठी 'ऑनलाईन ड्रॉ' पद्धतीचा अवलंबभाविकांना अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन


 तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी राज्यातील कानाकोपऱ्यासह शेजारील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि इतर राज्यांतून दरवर्षी लाखो भाविक तुळजापूर नगरीत दाखल होतात. कुलधर्म आणि कुलाचार करण्यासाठी येणाऱ्या या भाविकांमध्ये देवीची 'सिंहासन पूजा' करण्याचे विशेष महत्त्व आहे. अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या सिंहासन पूजेसाठी मंदिर संस्थानने ऑगस्ट २०२६ या महिन्याचे ऑनलाईन नोंदणी वेळापत्रक जाहीर केले आहे.

भाविकांना ही नोंदणी मंदिर संस्थानच्या https://online.shrituljabhavani.org या अधिकृत संकेतस्थळावर करता येणार आहे. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी मंदिर प्रशासनाने ऑनलाईन लॉटरी (ड्रॉ) पद्धत लागू केली असून, भाविकांच्या सोयीसाठी टप्प्याटप्प्याने अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

असे आहे ऑनलाईन नोंदणी व सोडतीचे वेळापत्रक:
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने दिलेल्या माहितीनुसार, पूजेचे नियोजन खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:

अ.क्र. प्रक्रियेचा तपशील सुरु होण्याचा दिनांक व वेळ अंतिम दिनांक व वेळ
१ सिंहासन पूजा ऑनलाईन नोंदणी १९/०७/२०२६ (सकाळी १०:००) २४/०७/२०२६ (सकाळी १०:००)
२ प्रथम ऑनलाईन सोडत (लॉटरी) २७/०७/२०२६ (सकाळी ११:००) (भाविकांना SMS पाठवला जाईल)
३ प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २७/०७/२०२६ (सकाळी ११:००) २८/०७/२०२६ (सकाळी १०:००)
४ द्वितीय ऑनलाईन सोडत (जागा रिक्त असल्यास) २८/०७/२०२६ (सकाळी ११:००) (भाविकांना SMS पाठवला जाईल)
५ द्वितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २८/०७/२०२६ (सकाळी ११:००) २९/०७/२०२६ (सकाळी १०:००)
६ तृतीय ऑनलाईन सोडत (जागा रिक्त असल्यास) २९/०७/२०२६ (सकाळी ११:००) (भाविकांना SMS पाठवला जाईल)
७ तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २९/०७/२०२६ (सकाळी ११:००) ३०/०७/२०२६ (सकाळी १०:००)
८ अंतिम बुकिंग यादी प्रसिद्ध करणे ३०/०७/२०२६ (सायंकाळी ०५:००) (ऑगस्ट महिन्याची अंतिम यादी)
पारदर्शक व्यवस्थेचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंहासन पूजेची संपूर्ण यंत्रणा संगणकीय प्रणालीद्वारे नियंत्रित केली जात आहे. त्यामुळे भाविकांनी कोणत्याही फसवणुकीला किंवा मध्यस्थांना बळी पडू नये. अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या मुदतीतच भाविकांनी आपली नोंदणी पूर्ण करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments