Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

'दिव्यांग मुलांच्या उत्साहात काटीत साजरी झाली ८० वी स्वातंत्र्यजयंती; मूकबधिर व अस्थियंग विद्यालयात देशभक्तीचा गजर'


'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
​काटी  | उमाजी गायकवाड
  तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कै. सोनबा येवले मूकबधिर निवासी विद्यालय आणि नरसिंगराव देशमुख अस्थियंग निवासी विद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

​कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संजय सुरेश राऊत आणि श्री. प्रकाश गणपती काकडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

​कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये व मनोगते
​विद्यार्थ्यांचा सहभाग: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अस्थिव्यंग विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील थोरांचे स्मरण करत आपले मनोगत अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केले. विशेषतः श्री. सुशांत शिरसागर यांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांची मन जिंकली.

​शिक्षक व मार्गदर्शकांची मनोगते: विद्यालयातील शिक्षक श्री. महेश भोसले, श्री. अनिल पाटील, श्रीमती शेख मॅडम आणि श्री. जायभाय सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजवितानाच शिक्षणाचे महत्त्व विषद केले. दिव्यांग मुलांनी जिद्दीच्या बळावर आयुष्यात यशस्वी होण्याचे आवाहन यावेळी वक्तागणानी केले.

​सूत्रसंचालन व आभार: कार्यक्रमाचे नेटके व प्रभावी सूत्रसंचालन श्री. राजकुमार नारायण थिटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. रमेश रामचंद्र राऊत यांनी मानले.
​खाऊ वाटप व सांगता: राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या आनंदोत्सवाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले.

​या विशेष कार्यक्रमामुळे काटी परिसरातील शिक्षण व सामाजिक वर्तुळातून विद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments