Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

दिव्यांग निधीच्या ५ टक्के खर्चासाठी ‘तामलवाडी’त रणकंदन! माजी सैनिक सावंत शिवाजी यांचे १५ ऑगस्टला उपोषण; ग्रामपंचायतीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
केंद्र शासनाचा ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६’ आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागासह ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्रामपंचायतीच्या स्व-उत्पन्नातून ५ टक्के निधी दिव्यांग बांधवांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायतीने मागील दोन वर्षांपासून या निधीचा विनियोग न केल्यामुळे संताप व्यक्त होत होता. याच्या निषेधार्थ १५ ऑगस्ट रोजी ‘आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सैनिक सावंत शिवाजी रामकृष्ण यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

दरम्यान, उपोषणाची दखल घेत ग्रामसेवक व प्रशासकांनी मध्यस्थी केली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील ७ दिवसांच्या आत मागील दोन वर्षांच्या (२०२४-२५ व २०२५-२६) दिव्यांग निधीचा योग्य विनियोग करून पात्र दिव्यांगांची यादी व खर्चाचा संपूर्ण तपशील देण्याचे लेखी पत्र प्रशासनाने दिले. या सकारात्मक आश्वासनानंतर माजी सैनिक सावंत यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले.

नियम पायदळी तुडविल्याचा आरोप
नियमानुसार ग्रामपंचायतीने दरवर्षी स्व-उत्पन्नातील ५ टक्के रक्कम दिव्यांगांच्या कल्याणासाठी वापरणे अनिवार्य आहे. परंतु, तामलवाडी ग्रामपंचायतीने २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन आर्थिक वर्षांत दिव्यांग बांधव व भगिनींकरिता एकही रुपया खर्च केला नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. स्वातंत्र्यदिनीच ग्रामपंचायत कारभाराचा बुरखा फाडत माजी सैनिकाने उपोषणाचा मार्ग अवलंबल्याने प्रशासनाची पळापळ झाली.

अधिकारी व लोकप्रतिनिधींची मध्यस्थी
उपोषणाची तीव्रता पाहून प्रशासक सौ. नुरबानू सिकंदर बेगडे व ग्रामपंचायत अधिकारी श्री. चैतन्य गोरे यांनी उपोषणकर्ते सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आचारसंहिता व प्रशासक नियुक्तीमुळे निधी खर्चास विलंब झाल्याचे सांगत, वरिष्ठ कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊन येत्या सात दिवसांत सर्व थकीत ५ टक्के निधीचा विनियोग करण्याचे लेखी आश्वासन त्यांनी दिले.

या प्रसंगी पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र चौगुले, प्रहार संघटनेचे तुळजापूर कार्याध्यक्ष सचिन शिंदे, युवानेते सिकंदर वाहिद बेगडे, ग्रामपंचायत कर्मचारी शशिकांत गायकवाड, शिपाई दस्तगीर पटेल, शिवाजी माळी यांच्यासह ग्रामस्थ व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सात दिवसांत निधी न मिळाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments