Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

रोटरी क्लब मुरूम सिटीच्या शिरपेचात मानाचे तीन तुरा; उत्कृष्ट सामाजिक कार्याचा गौरव

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
मुरूम : प्रा. सुधीर पंचगल्ले
सामाजिक बांधिलकी जपत वर्षभर विविध लोकउपयोगी उपक्रम राबविणाऱ्या रोटरी क्लब ऑफ मुरूम सिटीच्या कार्याची रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ ने दखल घेतली आहे. वर्ष २०२५-२६ मधील उल्लेखनीय कार्याबद्दल क्लबला तब्बल तीन मानाचे पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

लातूर येथे झालेल्या विशेष रोटरी पुरस्कार वितरण सोहळ्यात रोटरी क्लब मुरूम सिटीला ‘क्लब एक्सलन्स अवॉर्ड’, ‘डिजिसायटेशन अवॉर्ड’ आणि ‘बेस्ट अचिव्हमेंट इन पब्लिक इमेज’ या तीन प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

रोटरी क्लब मुरूम सिटीने केवळ उपक्रमांचे आयोजन न करता समाजातील तळागाळातील गरजू घटकांपर्यंत प्रत्यक्ष मदत पोहोचविण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सायकलींचे वाटप, शालेय स्तरावर विविध स्पर्धा व उपक्रम, गरजू व विधवा महिलांना स्वावलंबी करण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप, महिलांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम, आरोग्य शिबिरे, डॉक्टरांचा विशेष सन्मान, व्यापक वृक्षारोपण मोहीम तसेच ज्येष्ठ नागरिकांसोबत विविध सण साजरे करण्यासह सामाजिक जाणीव वृद्धिंगत करणारे उपक्रम क्लबने राबविले.

लातूर येथील पुरस्कार वितरण सोहळ्यास रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जयेश पटेल, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातूरे, डॉ. दीपक पोकळे यांच्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, रोटरी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

माजी अध्यक्ष प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी व सचिव कल्लाप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर राबविण्यात आलेल्या लोकउपयोगी कामांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले. क्लबच्या वतीने अध्यक्ष कल्लय्या स्वामी, सचिव प्रकाश रोडगे, सुनील राठोड, संतोष कांबळे, बाबासाहेब पाटील आणि डॉ. कमलाकर मोटे यांनी पुरस्कार स्वीकारले.

रोटरी क्लब मुरूम सिटीला मिळालेल्या या तिहेरी सन्मानाबद्दल क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 मुरूम, ता. उमरगा येथील रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने मानाचे तीन पुरस्कार स्वीकारताना रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य.

Post a Comment

0 Comments