येणेगूर /प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज हावळे याचा वाढदिवसानिमित्त गुरुवार दि.18 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसानिमित्त त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते मनोज हावळे हे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न अग्रक्रमाने सोडवतात. महिला तक्रार निवारण कार्यात समाज सेवक म्हणून सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून नेहमी अग्रेसर असतात.
यावेळी माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी मुरुम येथील शिक्षक योगेश पाटील, अनिल मोरे, विवेकानंद चौधरी, सुदीप ढंगे, प्रियांका काजळे, राजनंदिनी लिमयें, सदाफल्मास मुजावर, अमोल कटके, पत्रकार योगेश पांचाळ,आदीसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments