Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

खोताचीवाडी शाळेत शिवरायांचा जयघोष! विना-डीजे अन् वैचारिक उपक्रमांनी साजरी झाली 396 वी शिवजयंती

तुळजापूर|उमाजी गायकवाड 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जोपासत, तुळजापूर तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा खोताचीवाडी येथे 396 वी शिवजयंती अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. डीजेच्या गोंगाटाऐवजी लेझीमचा ताल, शिवगर्जना आणि वैचारिक स्पर्धांच्या माध्यमातून शिवरायांना आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली.

स्पर्धांतून उलगडले शिवचरित्र
शिवजयंतीच्या निमित्ताने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वसंध्येला चित्र रंगभरण आणि वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. तर मुख्य दिवशी शिवरायांच्या जीवनावर आधारित रंजक प्रश्नमंजुषा पार पडली. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राबद्दलची ओढ आणि माहिती वाढण्यास मदत झाली.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
कार्यक्रमाची सुरुवात गावात शिवप्रतिमेच्या प्रतिष्ठापनेने झाली. यावेळी संपूर्ण परिसर 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेली शिवगर्जना, शिवबाचा पाळणा, 'शिवबा माझा बसला घोड्यावर' हे गीत आणि पारंपारिक लेझीम नृत्य उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले.

विजेत्यांना रोख बक्षिसांची पावती
प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या संघांना गावातील जय हनुमान तरुण गणेश मंडळातर्फे प्रोत्साहनपर रोख बक्षिसे देण्यात आली: या प्रश्न मंजुषा कार्यक्रमात 
प्रथम क्रमांक: ₹2100,द्वितीय क्रमांक: ₹1101
तृतीय क्रमांक: ₹551देण्यात आली.

वैशिष्ट्य: या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे कोणताही डीजे न लावता, अत्यंत साध्या आणि शिस्तबद्ध पद्धतीने महाराजांच्या विचारांना साजेशा वातावरणात हा सोहळा पार पडला.

मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नवनाथ शिंदे, समितीचे सर्व सदस्य, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय पोषण आहार सेविका श्रीमती तृप्ती पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन शिक्षक श्री. भागवत बगाडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments