Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

प्रतापगडाच्या पोवाड्याने दुमदुमले सरस्वती विद्यालय; तामलवाडीत शिवजयंती उत्साहात साजरी!


काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणायुक्त वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पोवाड्याने आणि भाषणांनी कार्यक्रमात रंगत आणली.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन
कार्यक्रमाचे अध्यक्षपद त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बसवन्नाप्पा मसुते यांनी भूषवले. त्यांच्यासह प्रशालेचे प्राचार्य सुहास वडणे, पर्यवेक्षक महादेव मसुते, माजी पर्यवेक्षक सावळे सर आणि ज्येष्ठ शिक्षिका पीरजादे मॅडम या मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बालाजी रणसुरे सर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थिनी प्रगती कसबे, गायत्री राऊत आणि ईश्वरी जगताप यांनी आपल्या मनोगतातून शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची माहिती दिली.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे सपा सय्यद आणि प्रतीक्षा हेडे यांनी सादर केलेला प्रतापगडाचा वीररसपूर्ण पोवाडा. त्यांच्या पहाडी आवाजातील पोवाड्याने उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण केले.

शिवाजी महाराजांचा आदर्श काळाची गरज
प्राचार्य सुहास वडणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवरायांच्या युद्धकौशल्याचे आणि व्यवस्थापनाचे विविध पैलू उलगडून दाखवले. "विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता, महाराजांचे धाडस आणि त्यांचे गुण अंगी बाणवून जीवनात यशस्वी व्हावे," असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे आभार चुंगे सर यांनी मानले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments