काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुरुवार दि. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले पोवाडे,भाषणे आणि शिवकालीन वेशभूषेने उपस्थितांची मने जिंकली.
बक्षीस वितरणाने वाढला विद्यार्थ्यांचा उत्साह
केवळ उत्सवच नव्हे, तर गुणवत्तेचे कौतुक करण्याचा उद्देश ठेवून यावेळी विशेष बक्षीस वितरण सोहळा पार पडला. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित क्रीडा स्पर्धा आणि विविध शालेय स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
शिवजयंतीचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत कुंभारीतील चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्याचे पाठबळ
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल जाधव व कुंभारी माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष राहुल क्षीरसागर यांच्या वतीने विजेत्यांना शैक्षणिक साहित्य, ट्रॉफी आणि मेडल देण्यात आले. हे वितरण गावचे पोलीस पाटील विठ्ठल वडणे व नांदुरी केंद्राचे केंद्रप्रमुख संजय वाले यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्यासाठी गावातील पालक आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक इरशाद शेख, सहशिक्षक बालाजी दंडनाईक, पोपट सुरवसे, विठ्ठल गावित व सहशिक्षिका मनीषा जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
आमच्या ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा – 'Only न्युज धाराशिव'
0 Comments