काटी /उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात केंद्रीय मुख्याध्यापिका श्रीमती सी. आर. सूर्यवंशी यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या प्रसंगी विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. कुमारी भाग्यश्री चव्हाण, कुमारी अंजली तांबे, कुमारी श्रावणी गुंड, कुमारी श्रेया गुंड व कुमारी श्रुती गुंड यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित गीत, पोवाडा आणि प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
मुख्याध्यापिका श्रीमती छाया सूर्यवंशी व सहशिक्षिका श्रीमती अंजली निकते यांनी शिवरायांच्या पराक्रमाची आणि आदर्श जीवनचरित्राची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला सहशिक्षिका श्रीमती सुनिता समाने, श्रीमती मनीषा इंदापूरकर तसेच पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे संपूर्ण शाळा परिसर शिवमय वातावरणाने दुमदुमून गेला. 🚩
0 Comments