Only न्यूज धाराशिव | मुरुम प्रतिनिधी
अस्वच्छ परिसरामुळे नागरिक विविध आजारांना बळी पडतात, तर स्वच्छतेमुळे निरोगी आणि सुखकर आयुष्य लाभते. त्यामुळे स्वच्छता हीच खरी ईश्वरसेवा आहे, असे प्रतिपादन श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले यांनी केले.
ते श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे मौजे व्हांताळ येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात बोलत होते.
सोमवार, दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वसंत हिस्सल होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सूर्यकांत रेवते उपस्थित होते.
डॉ. रेवते यांनी आपल्या मार्गदर्शनात ई-कचरा ही अलीकडच्या काळातील गंभीर समस्या असल्याचे सांगत त्याच्या योग्य व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय समारोपात डॉ. वसंत हिस्सल यांनी संत गाडगे महाराजांचे जीवनकार्य उलगडून सांगत समकालीन अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला.
या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल देशमुख, डॉ. भरत शेळके, डॉ. सूर्यकांत राठोड, डॉ. अतुल बिराजदार, डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, प्रा. मनोज गायकवाड यांच्यासह शिबिरातील स्वयंसेवक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन निरंजन कटके यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. भरत शेळके यांनी केले.
Only न्यूज धाराशिव – आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा!
0 Comments