Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

"Only न्युज धाराशिव" च्या सकाळच्या सत्रातील (३१ मार्च २०२६) महत्त्वाच्या टॉप १५ बातम्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्र-धाराशिव संदर्भातील प्रमुख घडामोडी संक्षिप्त स्वरूपात पहा


"Only न्युज धाराशिव"वृत्तसेवा 
१)नक्षलवाद संपला: अमित शाह यांनी लोकसभेत सांगितले की, भारत आता पूर्णपणे नक्षलमुक्त झाला आहे; काँग्रेसवर टीका.
२)इराण-इस्त्राइल-यूएस तणाव वाढला: ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा सुविधा नष्ट करण्याची धमकी दिली; इराणकडून प्रत्युत्तर.
३)सेन्सस २०२७: पहिला टप्पा १ एप्रिलपासून सुरू होणार; तयारी अंतिम टप्प्यात.
४)इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट स्कीम: सरकारने ७,१०४ कोटींच्या २९ गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी दिली.
५)देहरादून दुर्घटना: सकाळच्या फेरीदरम्यान सेवानिवृत्त आर्मी ब्रिगेडियरला स्ट्रे बुलेट लागून मृत्यू.
६)चायनीज सीसीटीव्हीवर बंदी: भारत १ एप्रिलपासून हिकविजन, डाहुआ सारख्या चायनीज सीसीटीव्ही विक्रीवर बंदी घालणार.
७)आयपीएल तिकिट वाद: कर्नाटक प्रत्येक आमदाराला ३ आयपीएल तिकिटे देणार, डीके शिवकुमार यांचे विधान.
८)स्टेट बँक ऑफ इंडिया/मार्केट: सेन्सेक्स-निफ्टी २% पेक्षा जास्त घसरले; फिस्कल इयरचा सर्वात वाईट शेवट.
९)धाराशिव: शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी सुरतगाव ते तुळजापूर कॉंग्रेसची "शेतकरी संघर्ष न्याय यात्रा" प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड.धिरज पाटील, कॉंग्रेसचे प्रवक्ते हणमंतराव पवार यांच्या नेतृत्वात संपन्न
१०) तुळजापूर:तुळजाभवानी मंदिरात VIP एंट्री बंद
चैत्र पौर्णिमा उत्सवासाठी तीन दिवस VIP दर्शन बंद करण्याचा मंदिर संस्थानचा निर्णय; सामान्य भाविकांसाठी दर्शन सुलभ होण्यासाठी हा उपाय.
११)सुप्रीया सुले यांचा पेन्शन मुद्दा: पेन्शन अपग्रेड ही दान नव्हे तर हक्क आहे, असे सांगितले.
१२)धाराशिव: धाराशिवमध्ये गुटखा विरोधात आंदोलन कार्यवाही नाही झाली तर उग्र आंदोलन करणार प्रशासनाला अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा इशारा
१३)धाराशिव:सोलार प्रोजेक्टसाठी जागा अनिश्चित
धाराशिव पालिकेच्या सोलार प्रकल्पासाठी जागा निश्चित न झाल्याने दोनदा १८ कोटी रुपये परत; पुन्हा जागा पाहणी सुरू, पाणीपुरवठा वीजबिलात १३ कोटी बचत शक्य.
१४)आंतरराष्ट्रीय: स्पेनने इराण युद्धात सहभागी यूएस विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद केले.
१५) धाराशिव:बेंबळी येथील जिल्हा परिषद कन्या शाळेचा वाद सहशिक्षण (को-एज्युकेशन) करण्याच्या निर्णयाला पालक आणि गावकऱ्यांचा विरोध; संतप्त पालकांनी प्रशासनाला इशारा दिला.
(या बातम्या वर्तमानपत्रे, स्थानिक माध्यमे, व टिव्ही चॅनल स्रोतांवर संकलित केल्या आहेत.)

Post a Comment

0 Comments