Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

“तामलवाडीतील सरस्वती विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धेचा उत्साही सोहळा”

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शालेय वकृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

या प्रसंगी प्रशालेचे प्राचार्य सुहास वडणे सर, पर्यवेक्षक महादेव मसुते सर, माजी पर्यवेक्षक सावळे सर तसेच माजी विद्यार्थी डॉ. प्रा. गोरख पांडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावर्षी महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त शासनाकडून विशेष उपक्रम राबवले जात असून, त्याच अनुषंगाने विद्यालयात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्य आणि नेतृत्व गुण विकसित व्हावेत या उद्देशाने माजी विद्यार्थी प्रा. गोरख पांडागळे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले. यावेळी प्राचार्य सुहास वडणे सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

इयत्ता पाचवी ते सातवी गटासाठी “भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर”, “माझे आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर” अशा विषयांवर तर इयत्ता आठवी ते दहावी गटासाठी “युगपुरुष समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर”, “राष्ट्रकार्यातील त्यांचे योगदान”, “शिक्षण हे समाज परिवर्तनाचे शस्त्र” अशा विषयांवर सुमारे ३५ विद्यार्थ्यांनी प्रभावी मनोगते मांडली.

स्पर्धेत विविध विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली वक्तृत्व कला सादर केली. प्राचार्य वडणे सर यांनी विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर यांच्या विचारांबद्दल मार्गदर्शन केले.

स्पर्धेचे परीक्षण माजी पर्यवेक्षक सावळे सर, ज्येष्ठ शिक्षिका पिरजादे मॅडम व गिरे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राऊत सर यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वामी सरांनी मानले.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

Post a Comment

0 Comments